YCMOU बीएड प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, गुणवत्ता यादी चे गुणांकन बाबत महत्वपूर्ण माहिती

 YCMOU B Ed Admission Process Required Documents Basic Qualification Marking System for Merit List. 


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत बीएड प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करताना कोणतेही कागदपत्र अपलोड करावे लागत नाही परंतु भरलेली माहिती पडताळणी करण्यासाठी प्रमाणित कागदपत्रे विभागीय केंद्रावर पडताळणीसाठी उपलब्ध  करून द्यावे लागतात सदर कागदपत्रे पुढीलप्रमाणे.


अर्जदाराची कागदपत्र पडताळणी गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी निवड झाल्यास उमेदवाराने आपण online अर्जात भरलेल्या सर्व माहितीचा पुरावा देणारे तसेच सेवा सत्यता पडताळणीसाठीची प्रमाणित कागदपत्रे विभागीय केंद्रावर होणाऱ्या कागदपत्र पडताळणी साठी सोबत आणावीत. ती न आणल्यास उमेदवाराची कागदपत्र पडताळणी होणार नाही व संबंधित उमेदवार प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडेल याची नोंद घ्यावी.


क) मूळ प्रवेश अर्ज व ऑनलाईन संगणकीय अर्जाची प्रत आणि डी.एड./डी.टी.एड./ क्राफ्ट टीचर डिप्लोमा उत्तीर्णतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र


ख) शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या मूळ व प्रमाणित सत्यप्रती.


ग) प्रवेश अर्जात नोंद केल्याप्रमाणे प्रत्येक विद्यालयातील सुरुवातीपासून पुढील सर्व


नेमणुकीच्या आदेशांच्या मूळ व प्रमाणित सत्यप्रती, तसेच अनुभवाचे मूळ प्रमाणपत्र. घ) मागासवर्गीय असल्यास पुढे नमूद केल्याप्रमाणे मूळ प्रत व प्रमाणित सत्यप्रत.


अनुसूचित जाती (एस.सी.) - जातीचा दाखला अनुसूचित जमाती (एस.टी.) जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र विमुक्त जमाती / भटक्या जाती / इतर मागासवर्गीय / विशेष मागासवर्गीय (VJ/NT/OBC/SBC)_जातीचा दाखला, ऑनलाईन संगणकीय अर्जात नमूद केलेल्या नावाचे अर्जावर असलेल्या नावाचे वैध कालावधीचे नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र आवश्यक. ( आरक्षण शासन निर्णया नुसार बदल होऊ शकतात.)

(ङ) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांसाठी त्यांचे उत्पन्न संबंधित वर्षात आठ लाखापेक्षा कमी असल्याचा संबंधित अधिकाऱ्याचा प्रमाणित दाखला.


च) जन्मतारखेचा पुरावा दर्शविणारी कोणत्याही प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत. छ) सर्व सेवेचे नेमणूक आदेश, शिक्षणाधिकारी / शिक्षण उपसंचालक यांच्या शिक्षक किंवा पदमान्यता पत्राच्या सुरुवातीपासूनच्या सर्व साक्षांकित प्रती शाळा मान्यतापत्र.


ज) मेंटार (वरिष्ठ शिक्षक) मान्यता प्रमाणपत्र.

झ) शाळा अनुदानित असेल तर वर्षनिहाय शाळा तपासणी अहवालाच्या साक्षांकित प्रती. 

ञ) सेवापुस्तिकेतील संबंधित नोंदी. (संपूर्ण सेवापुस्तिकेची साक्षांकित केलेली फोटोकॉपी) 

ट) नावात बदल असल्यास नाव बदल पुरावा म्हणून राजपत्र.


ठ) सामाजिक आरक्षणांतर्गत येणाऱ्या उमेदवारांना


• दिव्यांग : किमान ४० % दिव्यांग असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र.


• प्रकल्पग्रस्त


: जिल्हा पुनर्वसन अधिकारी / सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, परंतु त्या प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव असणे आवश्यक.


• आपत्तीग्रस्त उपविभागीय अधिकारी / तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, परंतु त्या :प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव असणे आवश्यक.


• स्वातंत्र्यसैनिक पाल्य : पत्नी / मुलगा / अविवाहित मुलगी यांनी स्वातंत्र्यसैनिकाच्या ओळखपत्राची प्रत व पाल्याच्या नातेसंबंधाचा पुरावा.

 • आजी / माजी सैनिक पाल्य : सैनिकाची पत्नी / मुलगा / अविवाहित मुलगी यांना जिल्हा सैनिक बोर्डाचे प्रमाणपत्र आवश्यक. नातेसंबंधाचा पुरावा आवश्यक, डिस्चार्ज पुस्तक आवश्यक.

 • विधवा : महानगरपालिका / नगरपालिका / ग्रामपंचायत यांच्याकडून प्राप्त झालेले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.


घटस्फोटिता : विवाहनोंदणी दाखला किंवा न्यायालयाचे घटस्फोटाबाबतचे आदेश किंवा मुस्लीम महिलांच्या बाबतीत नियमाप्रमाणे निकाह लावणारे काझी / इमामांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र. ते प्रमाणपत्र नोटरी करून मराठी भाषेत भाषांतर करून आणणे आवश्यक.


• गोवा बेळगाव बिदर हा मराठी भाषिक प्रदेश असल्याने या उमेदवारांनी नियुक्ती आदेश व अनुभवाचे दाखले हे मराठी / हिंदी / इंग्रजीत आणावे व त्यावर संबंधित अधिकारी / मुख्याध्यापकाची सही व शिक्का आणणे अनिवार्य असेल. • मुलाखतीच्या वेळी वरील मूळ व साक्षांकित ( Attested) प्रमाणपत्रांआधारे उमेदवाराच्या प्रवेश अर्जातील माहितीची सत्यता पडताळून पाहण्यात येईल..


त्यामळे उपरोक्त आवश्यक ती कागदपत्रे उमेदवाराजवळ जवळ नसल्यास प्रवेश




शिक्षणक्रम प्रवेश पात्रता

किमान पात्रता

(८.१) यू.जी.सी. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी / पदव्युत्तर पदवी.

(८.२) पदवी / पदव्युत्तर पदवी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५०% (४९.५ ते ५० टक्क्यांपर्यंतचे गुण) व मागासवर्गीय उमेदवारांना किमान ४५ % (४४.५ ते ४५ टक्क्यांपर्यंतचे गुण) गुण असणे अनिवार्य आहे. (महाराष्ट्र शासनाने ज्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर स्केल लागू केला आहे अशा प्रवेशेच्छुना पदवी / पदव्युत्तर परिक्षा उत्तीर्णतेच्या गुणांची अट नाही, मात्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.)

( ८.३) डी.एड./डी.टी.एड./क्राफ्ट टीचर डिप्लोमा हे शिक्षणक्रम पूर्ण केलेले आणि मान्यताप्राप्त प्राथमिक स्तरावर शासनाने मंजूर केलेल्या पदावर पूर्णवेळ / अर्धवेळ काम करणाऱ्या व किमान दोन वर्षांचा (अर्धवेळ असल्यास ४ वर्षे) अनुभव असलेल्या अध्यापकांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रवेश मिळेल.

(८.४) प्रवेशासाठी किमान दोन वर्षांचा अनुभव अनिवार्य असेल. पूर्णवेळ / अर्धवेळ सेवेत असल्याचे व शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंत सेवेत ठेवले जाईल, असे शाळाप्रमुखांचे प्रमाणपत्र देऊ शकणाऱ्या पदवीधर शिक्षकांना या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.

९. प्रवेश अपात्रता

पुढील प्रकारचे अर्ज अपात्र ठरतात. तशी आवेदनपत्रे प्राप्त झाल्यास ती रद्द करण्यात येतील व उमेद्वारास याबाबत कळविले जाणार नाही. 
९. १) ज्यांच्या सेवा आदेशात प्राथमिक शिक्षक नियुक्ती असा उल्लेख नाही.

९. २) सध्या सेवेत असलेल्या शाळेच्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरणारे

९.३) अपूर्ण आणि खोट्या माहितीचे प्रवेश अर्ज

९. ४) सध्या सेवेत नसलेले शिक्षक

९.५) तासिका वेतनावर कार्यरत शिक्षक,

९.६) यू.जी.सी. मान्यता नसलेल्या विद्यापीठाचे पदवीधारक .

९.७) माध्यमिक/ उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक/प्रयोगशाळा सहायक/कनिष्ठ सहायक / लिपिक, ग्रंथपाल, इत्यादी.

९.८) पदवी वर्षाच्या अंतिम परीक्षेस बसलेले, परंतु निकाल न लागल्यामुळे पदवी परीक्षेचे पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेची सत्यप्रत न जोडणारे शिक्षक. 
९.९) बालवाडीत शिकविणारे शिक्षक

९. १०) तांत्रिक विद्यालये, कृषी विद्यालये व तत्सम अन्य विद्यालये, एम.सी.व्ही.सी. निदेशक (Instructor) हे प्रवेशासाठी पात्र नाहीत.


९. ११) प्रवेश अर्जावर मुख्याध्यापकाची सही नसणारे तसेच सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र न जोडणारे शिक्षक प्रवेशास अपात्र ठरतील. मात्र मुख्याध्यापकच स्वतः उमेदवार असेल, तर संस्थेचे सचिव वा शिक्षणाधिकारी यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे.

९.१२) मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेले विद्यार्थी अपात्र ठरतील.

९.१३) राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र / जात पडताळणी प्रमाणपत्र / ना सायस्तर नसल्याचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी मुदतीत सादर करू न शकणारे उमेदवार राखीव प्रवर्गातून प्रवेशास अपात्र ठरतील.



निवड प्रक्रिया

(११. १) सदर शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी तयार करताना केवळ ऑनलाईन संगणकीय अर्जात भरलेल्या माहितीचा विचार केला जातो. उदाहरणार्थ सेवाज्येष्ठता, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि अतिरिक्त पदवीचे गुण इत्यादी. आरक्षणासंदर्भात संगणक अर्जातील माहिती व शासन नियमांचे पालन करण्यात येते.

(११.२) प्रवेश गुणवत्ता यादी करताना प्रथम अनुभवानुसार पायाभूत गुण देण्यात येतात. २०२३-२५ तुकडीसाठी सेवा अनुभव नोंदवण्याचा दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यंत असेल. प्रत्येक वर्षासाठी एक गुण असे एकूण जितक्या वर्षांचा अनुभव 'असेल तितके गुण मिळतील. एका वर्षापेक्षा कमी कालावधीचे गुण ठरविताना जर अनुभव सहा महिने किंवा अधिक असेल तर एक गुण धरण्यात येईल. त्यापेक्षा कमी महिन्यांच्या सेवेला गुण देण्यात येणार नाहीत. अर्धवेळ काम करणाऱ्या शिक्षकांची शिक्षणक्रम प्रवेश पात्रता मुद्यांअतर्गत दिल्याप्रमाणे विचारात घेतली जाईल. प्रवेशासाठी मराठीचे पुरेसे ज्ञान उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे, त्यासंदर्भात कोणाचीही तक्रार ऐकली जाणार नाही.

(११.३) शैक्षणिक पात्रता वर्ग/ श्रेणी निहाय गुणदान पद्धती -

अ) डी.एड./डी.टी.एड./ क्राफ्ट टीचर पदविका शिक्षणक्रम उत्तीर्णता' या शिक्षणक्रमाची अर्हता असल्याने संबंधित शिक्षणक्रम उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र प्रवेशाच्यावेळी सादर करणे अनिवार्य असेल. मात्र त्यास कोणतेही अतिरिक्त गुणदान नसेल. 
ब) पदवी, पदव्युत्तर पदवी, किंवा पदवीनंतरची अतिरिक्त एक वर्षाची पदविका उत्तीर्ण असणाऱ्या अध्ययनार्थीना त्यात मिळालेल्या श्रेणीनुसार खालीलप्रमाणे गुण दिले जातात. मात्र त्यासाठी प्रवेशार्थीने त्यासंदर्भातील माहिती ऑनलाईन अर्जात संबंधित रकान्यात भरलेली असणे अनिवार्य असते.


वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रतेच्या वर्ग/ श्रेणीनुसार गुण प्राप्त होण्यासाठी प्रवेशेच्छू उमेदवाराने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरतेवेळी संबंधित शिक्षणक्रम उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. शिक्षणक्रम / परीक्षा प्रवेशित स्थितीतील माहिती भरू नये.

सूचना : जे विद्यार्थी पदव्युत्तर पदवीच्या द्वितीय श्रेणीमुळे प्रवेशास पात्र होतील त्यांना संबंधित पदव्युत्तर पदवीच्या श्रेणींचे गुण देण्यात येणार नाहीत.

(११.४) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम पूर्ण केलेले असल्यास बी.एड. प्रवेशासाठी गुणवत्ता यादीमध्ये मिळणारे अतिरिक्त गुण खालीलप्रमाणे प्राप्त होतील. मात्र ऑनलाईन प्रवेश अर्जात त्यासंदर्भातील योग्य माहिती भरणे अनिवार्य आहे. एका पातळीवरील एकापेक्षा अधिक शिक्षणक्रम पूर्ण केलेले असले तरी, प्रत्येक स्तरावरील एकाच शिक्षणक्रमाचे गुण प्रवेशासाठीच्या गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. मात्र online प्रवेश अर्ज भरतेवेळी संबंधित शिक्षणक्रमाचे उत्तीर्णतेचे गुणपत्रक प्रवेशार्थीकडे असणे आवश्यक आहे.




यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम पूर्ण केलेले असल्यास अतिरिक्त बीएड प्रवेशासाठी मिळणारे गुण.

प्रमाणपत्र शिक्षणक्रम सहा महिन्यासाठी किमान दोन गुण. पदविका शिक्षण क्रम दोन गुण.

पदवी शिक्षणक्रम चार गुण.

पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम पाच गुण.

पदव्युत्तर पदवी संशोधन शिक्षणक्रम सहा गुण.


संपूर्ण माहिती पत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.